रेल्वे भरतीचे वार्षिक कॅलेंडर जाहीर; वर्षातून ‘इतक्या’ परीक्षा घेतल्या जाणार | Railway Recruitment Calendar
मुंबई | रेल्वे भरती मंडळाने या वर्षीच्या भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर (Railway Recruitment Calendar) प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी आणि यूपीएससी प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे केली जात होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या कॅलेंडरनुसार वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेतील भरती संदर्भात मोठी घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे रेल्वे भरती प्रक्रियेला गती मिळेल आणि विहित प्रवर्गासाठी विहित मुदतीत परीक्षा घेता येईल. जेणेकरून रेल्वे भरती परीक्षेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना पूर्वनिश्चित पद्धतीने परीक्षेच्या अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
Railway Recruitment Calendar
नव्या वार्षिक कॅलेंडरनुसार, टेक्निशियनची भरती एप्रिलमध्ये, एनटीपीसी भरती जूनमध्ये आणि लेव्हल-१ भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू नये म्हणून यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीमध्ये केली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
रेल्वे भरती कॅलेंडर २०२४
असिस्टंट लोको पायलटची भरती जानेवारी-मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. यानंतर, जुलै-सप्टेंबरमध्ये, नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर ४, ५, ६ साठी भरती होईल. या कालावधीत, रेल्वे कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणीसाठी देखील भरती केली जाईल. तसेच रेल्वे श्रेणी -१ (ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणीची भरती ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणार आहे.
वार्षिक कॅलेंडरचे फायदे
– जर उमेदवार एका संधीत पात्र ठरला नाही तर भविष्यात त्याच्यासाठी अधिक संधी असणार
– प्रत्येक वर्षी पात्र ठरलेल्या उमेदवारांना समान संधी असतील.
– निवडलेल्यांना उत्तम करिअर प्रमोशनची शक्यता असेल.
– निवड प्रक्रिया, प्रशिक्षण आणि नियुक्त्या जलद केल्या जातील.