कोणतीही परिक्षा नाही, 10 वी पास उमेदवारांची टपाल जीवन विमा विभागात थेट मुलाखतीद्वारे होणार निवड | Postal Life Insurance Mumbai Bharti 2023
मुंबई | टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती (Postal Life Insurance Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Postal Life Insurance Mumbai Bharti 2023
वरील रिक्त पदाच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – उपनिदेशक, डाक जीवन विमा, तळ मजला, मुख्य टपाल कार्यालय, जुनी इमारत, मुंबई – 400001
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड / संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Postal Life Insurance Mumbai Notification 2023
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in