Paytm कंपनीत Work From Home सह 3000+ जागांसाठी भरती, 12 वी/पदवीधराना संधी | Paytm Jobs 2023

0
2935

मुंबई | वर्क फ्रॉम होमच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. पेटीएम कंपनीकडून ही संधी देण्यात येत असून या भरती (Paytm Jobs 2023) अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. यामध्ये टेक्निकल, नॉन-टेक्निकल पदांचा समावेश आहे.

Paytm Jobs 2023

वरील रिक्त पदांसाठी 12 वी तसेच पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार असून जवळपास संपूर्ण भारतभरातील उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

वरील प्रकारच्या रिक्त पदांमध्ये काही जागांसाठी वर्क फ्रॉम होम, तर काही जागांसाठी प्रत्यक्षात ऑफिसला जाऊन काम करावे लागणार आहे. क्लाइंट सर्व्हिसिंग इंटर्न, मायक्रो मार्केट मेनेजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, एरीआ सेल्स मेनेजर अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना कामाचे संपूर्ण ट्रेनिंग देखील कंपनी कडून दिले जाणार आहे. प्रत्येक पदानुसार आणि त्याच्या विभागानुसार काम करावे लागणार आहे. यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक खाली दिलेल्या आहेत.

PAYTM Job Notification – Paytm Career 2023
Online Apply – Paytm Recruitment 2023 (ही पेटीएमची अधिकृत साईट आहे)

वरील रिक्त पदांसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला इमेल द्वारे भरतीच्या पुढील अपडेट्स दिल्या जातील. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंपनीचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. सदर रिक्त पदांसाठी कंपनी नियमानुसार चांगला पगार दिला जाणार आहे.