आता Google Pay वरून डिलीट करा ट्रँजेक्शन हिस्टरी! ‘ही’ ट्रिक फॉलो करा.. जे नक्कीच तुमच्या फायद्याची आहे.

0
3597

सध्याच्या डिजिटल युगात आपण कसलेही व्यवहार करायचे असले तरी ते डिजिटल माध्यमातूनच केले जातात. अगदी मोठे मोठे व्यवहार देखील आता ऑनलाईन केले जात आहेत. यासाठी सध्या Google Pay सारखे अ‍ॅप लोकांच्याकडून सर्रास वापरले जात आहेत.

डिजीटल पेमेंट सुविधेमुळे UPI च्या ऑनलाइन व्यवहारांची प्रक्रिया सुलभ झाली आहे. परंतु यात अनेकदा अडचणीही येतात. तर कधी कधी आपल्या याच्या वापराचे पुरेशे ज्ञान असत नाही, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला काही गुगल पे वरून केलेले व्यवहार डिलीट करायचे असतात. परंतु ते कसे डिलीट करायचे किंवा ते इतरांपासून लपवण्यासाठी काय करायचे हे कळत नाही.

गुगल पे मध्ये केलेल्या व्यवहारांच्या तपशीलाची हिस्ट्री डिलीट करण्याचा ऑप्शनच तेथे दिसत नाही. त्यामुळे आपली अनेकदा पंचाईत होते. परंतु आता आम्ही तुम्हाला अनावश्यक वाटणारे ट्रँजॅक्शन कसे डिलीट करायचे अर्थात ट्रँजॅक्शन हिस्ट्री डिलीट कशी करायची याची माहिती देणार आहोत… चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अशा पद्धतीने करा ट्रँजॅक्शन हिस्ट्री डिलीट

पहिल्यांदा तुम्ही वापरत असेलेले Google Pay अकाऊंट ओपन करा. गुगल पे अकाऊंट ओपन केल्यावर वरच्या बाजूला तुमच्या प्रोफाइल पिक्चरचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला सेटिंग्जचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून Privacy and Security चा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यानंतर आणखी एक पर्याय दिसेल ‘डेटा आणि पर्सनलायझेशन’, यावर देखील क्लिक करून पुढे जावे लागेल.

आता तुमच्यासमोर Google Account निळ्या रंगात दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गुगल अकाऊंटची एक नवीन विंडो ओपन होईल. याठिकाणी तुम्ही Payment Transactions and Activities या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा, येथे तुम्हाला ‘डिलीट’ पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हव्या त्या वेळेचा ट्रॅन्जेक्शन डिलीट करता येतो. यासाठी तुम्हाला हवा तो टाइम, डेट निवड करावी लागेल. त्यानंतर तुमच्या समोर त्यादरम्यानचे ट्रॅन्जेक्शन ओपन होतील. त्यातुन तुम्हाला नको असेलले ट्रॅन्जेक्शन डिलीट करा. खालील चित्रांवरून देखील हे तुमच्या सहज ध्यानात येईल.