अर्ज करण्याची शेवटची संधी: Any Graduate उमेदवारांना 37 हजार पगाराची सरकारी नोकरी | New India Assurance Recruitment 2024
मुंबई | न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागांच्या भरतीची (New India Assurance Recruitment 2024) घोषणा करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या रिक्त जागांच्या भरतीबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार सहाय्यक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
New India Assurance Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर/समकक्ष. तसेच उमेदवार ज्या राज्यासाठी/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी – सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिना 37,000/- इतके वेतन दिले जाईल.
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – New India Assurance Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For New India Assurance Company Ltd. Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/