राज्य नगर परिषद भरती परीक्षा रद्द | Nagar Parishad Bharti 2023
मुंबई | राज्य नगरपरिषद संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा संवर्गातील विविध पदांवर भरती (Nagar Parishad Bharti 2023) परीक्षा होणार होती. त्यासाठी आज गुरूवार (ता. 2) व शुक्रवारी ( ता. 3) रोजी होणाऱ्या परीक्षा तूर्त रद्द केल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करू, असे राज्य निवड समितीचे अध्यक्ष मनोज रानडे यांनी जाहीर केले.
राज्यात मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन तीव्र होत आहे. त्यामुळे एसटी बस सेवा तसेच इंटरनेट सेवा काही जिल्ह्यात बंद आहेत. त्यामुळे परीक्षार्थीना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचता येणे अशक्य आहे हे विचारात घेऊन परीक्षा तूर्त रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रसिध्दीपत्रकात काय म्हणटलय? वाचा
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षेचे सत्रनिहाय वेळापत्रक या संचालनालयाच्या क्र.नपप्रसं/ कक्ष- ३अ/संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१ / २०२३ / ५६५१, दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्र व क्र.नपप्रसं/ कक्ष- ३अ/संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१ / २०२३/५८०५, दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आले होते. तथापि, राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद आहेत. या बाबी विचारात घेवून संचालनालयाच्या क्र. नपप्रसं/ कक्ष- ३ अ / संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१/२०२३/५६५१, दि. १६ ऑक्टोबर, २०२३ व दि. २३ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे प्रसिध्दपत्रकानुसार होणाऱ्या खालील परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षेच्या सुधारीत तारखा संचालनालयाच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिध्द करणेत येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.