पदवीधरांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांवर नोकरीची संधी, 2 लाखाहून अधिक पगार | MMRCL Bharti 2023
मुंबई | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MMRCL Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 17 रिक्त जागांची भरती केली जाणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक अभियंता, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, उपलेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2023 आहे.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 5 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा. सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार एमएमआरसीएलकडे आहे. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवावर आधारित मुलाखतीसाठी निवडले जाईल. MMRCL वैयक्तिक मुलाखतीची सूचना आणि तुमच्या अर्जासंबंधी इतर कोणतीही माहिती फक्त नोंदणीकृत ई मेल आयडीद्वारे पाठवेल. मुलाखतीसाठी आणि नियुक्तीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही प्रवास भत्ता/ प्रतिपूर्ती दिली जाणार नाही.
PDF जाहिरात – MMRCL Mumbai Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – MMRC Application 2023