मुंबई | कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे पीठासीन अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात (Ministry Of Labour And Employment Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी आपले अर्ज श्री. एस. आर. दत्ता, उपसचिव, कक्ष क्रमांक ३१८, कामगार आणि रोजगार मंत्रालय, श्रमशक्ती भवन, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठवावेत.
Ministry Of Labour And Employment Bharti 2024
उमेदवाराच्या नियुक्तीसाठी पात्रता, पगार, इतर अटी व शर्ती न्यायाधिकरण सुधारणा कायदा, 2021 आणि न्यायाधिकरण (सेवेच्या अटी) नियम, 2021 च्या तरतुदींद्वारे नियंत्रित केल्या जातील.
इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज फक्त ऑफलाईन पध्दतीने दिलेल्या पत्यावर जमा करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Ministry of Labour and Employment 2024
अधिकृत वेबसाईट – labour.gov.in