Career

10वी उत्तीर्णांना संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 21 हजार पगार आणि इतर सुविधाही मिळणार.. संधी चुकवू नका | Ministry Of Defense Bharti 2024

मुंबई | संरक्षण मंत्रालय, सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Ministry Of Defense Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार विविध पदांच्या एकूण 71 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

रिक्त पदांमध्ये कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एमटीएस, ट्रेडसमन मेट, व्हेईकल मेकॅनिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, लीडिंग फायरमन, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर अशा विविध पदांचा समावेश आहे.

Ministry Of Defense Bharti 2024

वरील पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड.
  • अधिवास.
  • मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • दहावी किंवा मॅट्रिकची गुणपत्रिका.
  • अनुभवाचे प्रमाणपत्र.
  • सक्षमांकडून जात/श्रेणीचा पुरावा [SC/ST/OBC/PH(PWD)/ESM/EWS] अधिकारी.
  • प्रवेशपत्र.

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMinistry of Defense Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mod.gov.in/


भारत सरकारच्या अवजड वाहन कारखान्यात 320 शिकाऊ पदांसाठी भरती; डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधरांना मोठी संधी | HVF Apprentice Recruitment 2023

मुंबई | भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या हेव्ही व्हेईकल फॅक्टरी, चेन्नई अंतर्गत शिकाऊ पदांसाठी मोठी भरती (HVF Apprentice Recruitment 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून विविध पदांवरील तब्बल 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदनिहाय जागांचा तपशील : Category-I Graduate Apprentices
पदवीधर प्रशिक्षणार्थी : 220 जागा
  • मॅकेनिकल इंजिनिअरिंग : 50 जागा
  • इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग : 16 जागा
  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग : 19 जागा
  • सिव्हिल इंजिनिअरिंग : 15 जागा
  • ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग : 10 जागा
  • मॅकेनिकल इंजिनिअरिंग : 50 जागा
  • इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग : 30 जागा
  • कॉम्प्युटर इंजिनिअरिंग : 07 जागा
  • सिव्हिल इंजिनिअरिंग : 05 जागा
  • ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग : 18 जागा
Category-III Non-Engineering Graduate Apprentices (Arts/Science/Commerce)
नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस: 100 पदे
  • B.A. – Tam / English / History / Economics
  • B.Sc.- Math / Phy/ Chem / Computer Science
  • B.Com. – All / BBA / BCA

शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) : अभियांत्रिकी (Engineering) / तंत्रज्ञान (Technical) पदवी.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस : अभियांत्रिकी / तंत्रज्ञान डिप्लोमा.
नॉन-इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस : BA/B.Sc/B.Com/BBA/BCA.

निवड प्रक्रिया – संबंधित विषयात मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे सूचित केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना HVF, Avadi, चेन्नई येथे प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहावे लागेल.

शिकाऊ उमेदवारांना स्टायपेंड

पदवीधर प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी/तंत्रज्ञान) : 9000 रुपये
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ : 8000 रुपये
नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 9000 रुपये

अर्ज करण्याची प्रक्रिया
  1. अधिकृत वेबसाइट boat-srp.com वर जा.
  2. नोंदणी केल्यानंतर, फॉर्ममध्ये आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  3. सर्व कागदपत्रे जोडा.
  4. फॉर्म भरा. त्याची प्रिंट काढून ठेवा.

PDF जाहिरात – Heavy Vehicles Factory Apprenticeship Recruitment
ऑनलाईन अर्ज करा –  Apply for Heavy Vehicles Factory Apprenticeship Recruitment

Back to top button