Career

परीक्षा न देता गृह मंत्रालयात पदवीधरांना नोकरीची संधी, महिना पगार 1 लाख 12 हजार, जाणून घ्या सविस्तर माहिती | MHA Recruitment 2024

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या अखत्यारितील सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. आता परीक्षा न  देता देखील गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) नोकरीची संधी मिळणार आहे.

गृह मंत्रालयानं नुकतीच असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-I आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. गृह मंत्रालय भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारास देशातील कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.

MHA Recruitment 2024

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 40 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवार 2 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

गृह मंत्रालयात कोणत्या पदांसाठी भरती होणार? 

सहाय्यक- 07 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड-I-24 पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – 09 पदे

गृह मंत्रालयात निवड झाल्यावर किती मिळणार वेतन?

सहाय्यक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-6 अंतर्गत रुपये 35,400 ते 112400 रुपये दिले जातील. स्टेनोग्राफर ग्रेड-I पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल – 6 द्वारे 35400 रुपये ते 112400 रुपये वेतन दिले जाईल. तसेच अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 4 द्वारे रुपये 25500 ते रुपये 81100 पर्यंत वेतन दिले जाईल. तर

अर्ज करण्याची पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व संबंधित पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

अर्जाची लिंक पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर MHA Recruitment 2024 Notification यावर क्लिक करा. गृह मंत्रालय भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता आणि योग्यरित्या भरलेला अर्ज संबंधित कागदपत्रांसह एसपी (प्रशासक), NIA मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे पाठवू शकता.

Back to top button