मोठी बातमी : पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध; ‘असा’ करा अर्ज | Maharashtra Shikshak Bharti 2024
मुंबई | शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) शिक्षक भरतीसाठी (Teacher recruitment) पवित्र पोर्टलच्या (PAVITRA PORTAL) माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
या भरती प्रक्रिये अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेतली होती.
Maharashtra Shikshak Bharti 2024
या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिराती tait2022.mahateacherrecruitment या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहे. त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा व मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत, याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
Phase 1 Without Interviews Advertisements Download Link
Phase 1 With Interviews Advertisements Download Link
महत्त्वाच्या सूचना
– प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि ‘यूजर मॅन्युअल दिले आहे.
– उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in
– उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्यासाठी कालावधी : ८ आणि ९ फेब्रुवारी
– प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल
– पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी ‘edupavitra2022@gmail.com’ या ईमेलवर पत्रव्यवहार करावा.