Career

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 रिक्त जागांची भरती, 10 वी ते पदवीधरांना संधी | Maharashtra PWD Recruitment 2023

मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत विविध रिक्त पदांची मेगाभरती (Maharashtra PWD Recruitment 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण 2109 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.

Maharashtra PWD Recruitment 2023

याठिकाणी कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 2109 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • परीक्षा शुल्क – 
    • खुला – 1000/- रू.
    • राखीव – 900/- रू.

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या  लिंक द्वारे अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. मुलाखतीची तारीख आणि ठिकाण नंतर कळवले जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात I – Maharashtra PWD  Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा (16 ऑक्टोबर पासून) – Apply For Maharashtra PWD 
अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in 

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव एकूण जागा 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)532
कनिष्ठ अभियंता (विद्युत)55
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ5
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1378
लघुलेखक उच्चश्रेणी8
लघुलेखक निम्नश्रेणी2
उद्यान पर्यवेक्षक12
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ9
स्वच्छता निरीक्षक1
वरिष्ठ लिपिक27
प्रयोगशाळा सहाय्यक5
वाहनचालक2
स्वच्छक32
शिपाई 41
एकूण2109 Vacancies 

महत्वाचे – शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने नुकत्याच काढलेल्या जाहिरातीनुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) गट ब अराजपत्रितच्या 532 जागांसाठी फक्त डिप्लोमा आणि डिप्लोमा करून डिग्री केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार होता. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क च्या 1378 जागांसाठी डिप्लोमा, डिग्री, एमई/एमटेक अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार होता.

शासनाच्या या अजब निर्णयावर राज्यातील अभियांत्रिकी पदवीधारकांनी नाराजी व्यक्त केली होती, तसेच सरसकट सर्वांना संधी देण्याची मागणी केली होती. याबाबत विद्यार्थ्यांकडून पाठ पुरावाही करण्यात आल्याने पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यात यश आले आहे. त्यामुळे आता डिग्रीच्या विद्यार्थ्याना वर्ग ब साठी अर्ज सादर करता येणार आहेत. 


मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून, इच्छूक आणि पात्र उमेदवारांना 4 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

याठिकाणी, ‘व्यवस्थापकीय संचालक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या केंद्र शासनाच्या सेवेतील किमान स्तर ( Level) – 14 वेतनश्रेणीतील किंवा राज्य अभियांत्रिकी सेवेतील किमान स्तर (Level) एस-30 वेतनश्रेणीतील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – 32

PDF जाहिरात – Maharashtra PWD Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in 

Back to top button