Career

कृषी विभागद्वारे परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर | Maharashtra Krushi Vibhga Bharti Result

मुंबई | कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) व वरिष्ठ लिपीक या संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा निकाल विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

Maharashtra Krushi Vibhga Bharti Result

सदर निकालामध्ये IBPS संस्थेकडून ज्या उमेदवारांनी गैरमार्गाचा (Unfair Means) अवलंब केलेला आहे. त्या उमेदवारांची यादी प्राप्त झालेली आहे. त्यानुषंगाने तसेच कृषी विभागाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या उक्त संवर्गाच्या जाहिरातीमधील मुद्दा क्र.१९.४ नुसार सदर उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली असून त्या उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. सदर उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे.

Back to top button