मुंबई | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Maha IT Corporation Ltd Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी, लेखा कार्यकारी, असिस्टंट टॅक्स मॅनेजर पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच असिस्टंट टॅक्स मॅनेजर या पदाकरिता ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
Maha IT Corporation Ltd Bharti 2024
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400020.
ई-मेल पत्ता – rupali.gaikwad@mahait.org
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखापरीक्षण अधिकारी | B.Com with CA/CMA Inter passed/ MBA Finance/Master degree in Finance. |
वरिष्ठ लेखा कार्यकारी | B.Com (M.Com / CA or CMA Inter preferred) |
लेखा कार्यकारी | Post Graduate in Commerce with not less than 50% mark |
असिस्टंट टॅक्स मॅनेजर | Qualified CA/CMA |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लेखापरीक्षण अधिकारी | Rs. 40,000/- to Rs.60,000/- Per Month |
वरिष्ठ लेखा कार्यकारी | Rs. 35,000/- to Rs.50,000/- Per Month |
लेखा कार्यकारी | Rs. 25000/- to Rs.30,000/- Per Month |
असिस्टंट टॅक्स मॅनेजर | Rs. 60,000/- to Rs.80,000/- Per Month |
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Maha IT Corporation Ltd Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://mahait.org/