शेवटची संधी: 10 वी ते पदवीधरांसाठी लातूर महापालिका अंतर्गत भरती; त्वरित अर्ज करा | Latur Mahanagarpalika Bharti 2024
लातूर | लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध श्रेणींची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सरळसेवा स्वरूपाची असून एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
श्रेणी-1, श्रेणी-2 व श्रेणी-3 या संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे.
सदर भरतीचे ऑनलाईन अर्ज 22 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, तांत्रिक, विधी, पर्यावरण अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे, तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे.
अर्ज करण्याचा कालावधी दि. 22 डिसेंबर, 2023 शुक्रवार दुपारी 4.00 वाजेपासून ते दि. 14 जानेवारी, 2024 रविवार रात्री 11.59 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mclatur.org या संकेतस्थळावर दि. 21 जानेवारी, 2024 रविवार रात्री 11.59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Name Of Post | Vacancy |
पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१ | 1 |
तांत्रिक सेवा श्रेणी-१ | 1 |
वैद्यकीय सेवा श्रेणी-२ | 1 |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२ | 2 |
विधी सेवा श्रेणी -२ | 1 |
अग्निशमन सेवा श्रेणी-२ | 1 |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | 4 |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | 4 |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | 1 |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | 2 |
निम वैद्यकीय सेवा श्रेणी-३ | 1 |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | 4 |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | 4 |
अग्निशमन सेवा श्रेणी-३ | 9 |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | 10 |
अग्निशमन सेवा श्रेणी-३ | 30 |
तांत्रिक सेवा श्रेणी-३ | 4 |
Name Of Post | Educational Details |
पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) पर्यावरण क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
तांत्रिक सेवा श्रेणी-१ | अ) संगणक विषयासह वी.ई/बी.टेक/एम.सी.ए. पदवी. व) प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सेंटर अॅडमिनीस्ट्रेशन, नेटवर्कीगमधील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
वैद्यकीय सेवा श्रेणी-२ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.). ब) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. क) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. इ) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. क) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
विधी सेवा श्रेणी -२ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी. व) उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये किमान ३ वर्षे अधिवक्ता/वकील म्हणून कामाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
अग्निशमन सेवा श्रेणी-२ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.आ) राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपुर येथुन B.E.Fire Engineering उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडून Grade-1 ही पदवी प्राप्त केलेली असावी, इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ई) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 3)MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.ब) नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) नेमणुकीनंतर ३ वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड)MS-CIT किवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. क) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. |
निम वैद्यकीय सेवा श्रेणी-३ | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. ब) सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म. (B.Pharm) पदवी उत्तीर्णक) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वेध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ड) संबंधित विषयाच्या कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. फ) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. क) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 3) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
अग्निशमन सेवा श्रेणी-३ | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. ब) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण. क) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. ड) जड वाहन चालक म्हणून किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक. १४ अग्निशमन सेवा श्रेणी-३ चालक – यंत्रचालक इ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. फ) शारीरिक पात्रताः- १. उंची किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.) २. छाती- साधारण ८१ सें.मी. फुगवून-५ सें.मी. जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही.) ३. वजन- किमान ५० कि.ग्रॅ. ४. दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – ६/६ तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली) 3) उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा अधिक असू नये. |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व) मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. |
अग्निशमन सेवा श्रेणी-३ | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. व) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड) शारीरिक पात्रताः- १. उंची किमान १६५ सें.मी. (महिला उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी.) १६ अग्निशमन सेवा श्रेणी-३ फायरमन २. छाती- साधारण ८१ सें.मी. फुगवून-५ सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.) ३. वजन- किमान ५० कि.ग्रॅ. ४. दृष्टी- चांगली. (विना चष्म्याने दृष्टी ६/६ तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली) इ) वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा अधिक असू नये. (माजी सैनिक वगळून) फ) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
तांत्रिक सेवा श्रेणी-३ | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण.ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ड) MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. |
Name Of Post | Salary |
पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी-१ | S-२० ५६१००-१७७५०० |
तांत्रिक सेवा श्रेणी-१ | S-१५ ४१८००-१३२३०० |
वैद्यकीय सेवा श्रेणी-२ | S-१५ ४१८००-१३२३०० |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-२ | S-१५ ४१८००-१३२३०० |
विधी सेवा श्रेणी -२ | S-१५ ४१८००-१३२३०० |
अग्निशमन सेवा श्रेणी-२ | S-१५ ४१८००-१३२३०० |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | S-१४ ३८६००-१२२८०० |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | S-१४ ३८६००-१२२८०० |
अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ | S-१४ ३८६००-१२२८०० |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | S-१४ ३८६००-१२२८०० |
निम वैद्यकीय सेवा श्रेणी-३ | S-१३ ३५४००-११२४०० |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | S-१३ ३५४००-११२४०० |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | S-१० २९२००-९२३०० |
अग्निशमन सेवा श्रेणी-३ | S-६ १९९००-६३२०० |
प्रशासकीय सेवा श्रेणी-३ | S-६ १९९००-६३२०० |
अग्निशमन सेवा श्रेणी-३ | S-५ १८०००-५६९०० |
तांत्रिक सेवा श्रेणी-३ | S-१ १५०००-४७६०० |
PDF जाहिरात – Latur Mahanagarpalika Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://mclatur.org/recruitment/