Career

Infosys अंतर्गत कोणत्याही शाखेतील पदवीधरांना नोकरी; थेट मुलाखतीव्दारे निवड, संधी चुकवू नका | Infosys Recruitment 2023

पुणे | Infosys कंपनी अंतर्गत Customer Support process पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना नोकरीची (Infosys Recruitment 2023) संधी उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी फ्रेशर्स तसेच अनुभवी दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण 30 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.

Infosys Recruitment 2023

सदर पदांची भरती थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. यासाठी 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 यावेळेत पुणे येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलाखतीचा पत्ता – फेज 1, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, बिल्डिंग B1, तळमजला, हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र 411057

Infosys मध्ये नोकरीसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी खालील लिंकवरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

कामाचे स्वरूप आणि आवश्यक पात्रता
कॉल/चॅट/मेलवर क्लायंटच्या समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे. 24*7 मध्ये काम करण्यासाठी तयार असणे. कार्यालयीन वातावरणात काम करण्याची तयारी असणे विश्लेषणात्मक समस्या सोडवणे, ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि ग्राहकांच्या समस्यांचे स्वतंत्रपणे, पूर्ण आणि कार्यक्षमतेने निराकरण करण्यासाठी त्वरित विचार करण्याची क्षमता, ग्राहकांच्या वेळेबद्दल आदर दाखवणे, वेळेचे व्यवस्थापन करणे.

आवश्यक कागदपत्रे
अपडेट केलेला बायोडाटाची प्रिंट, 2 फोटो, ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट), सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे (10वी, 12वी, पदवी (सेम वाइज मार्कशीट, सीएमएम. तात्पुरती आणि मूळ पदवी).

Infosys Pune Job Registration 2023
Back to top button