Career

IDBI बँकेत विविध पदांसाठी मेगाभरती; कोणत्याही शाखेतील पदवीधरांना संधी, 540 रिक्त जागा | IDBI Bank Bharti 2024

मुंबई | इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात IDBI बँक अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती (IDBI Bank Bharti 2024) जाहिर करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 522 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड किंवा आयडीबीआय बँक ही भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ही बँक सर्वसाधारण क्रमवारीत भारतामधील चौथी मोठी बँक आहे. 1964 साली भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे वाढत्या भारतीय उद्योगक्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरता आयडीबीआय बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

IDBI Bank Bharti 2024

बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांच्या एकूण 522 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

  • वयोमर्यादा –
    • किमान – 20 वर्षे
    • कमाल – 25 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • 200/- for SC/ST/PWD candidates (Only Intimation Charges)
    • 1000/- for all others (Application Fees and Intimation Charges)

शैक्षणिक पात्रता – आयडीबीआय बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. PGDBF यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना IDBI बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ‘O’) म्हणून समाविष्ट केले जाईल.

PDF जाहिरातIDBI Bank Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून) Online Apply For IDBI Bank Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.idbibank.in/


IDBI बँक अंतर्गत अर्धवेळ बँकेचे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल व्यवस्थापक, HR, IDBI बँक, IDBI टॉवर, WTC कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र – 400005

शैक्षणिक पात्रता – MBBS/MD from any recognized University/College approved by Medical Council of India in Allopathic system of medicine. Applicant having MD –Medicine qualifications would be preferred

PDF जाहिरातIDBI Bank Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.idbibank.in/

Back to top button