News

मुलीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत होऊ नये म्हणून कुटुंबियांनी केलं वेगळचं कांड; सर्वत्र खळबळ, गुन्हा दाखल | Kolhapur Crime News

कोल्हापूर | जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीचं ज्या तरूणाशी प्रेम संबंध आहेत, त्याच्याशी तिचे लग्न होऊ नये यासाठी जादूटोणा व अघोरी प्रकार करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल पवार याने आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोंदू बाबासह चौघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल पवार याचे त्याच्याच गावात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी दोन्ही कुटुंबियांना माहिती होती. मात्र मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे आपल्या मुलीचं लग्न राहुलशी होऊ नये यासाठी रेश्मा बुगडे, शामराव बुगडे यांनी जादूटोण्याचा मार्ग पत्करला. 

राहुल पवार त्याच्या प्रियेसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित लोकांसह बुगडे यांच्या घरी गेला होता. मात्र मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. काहीतरी कामधंदा कर मग लग्नाचे बघू असे त्याला सांगण्यात आले होते.

दरम्यान मुलीचं लग्न राहुलशी होऊ नये यासाठी बुगडे कुटुंबियांनी एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोणा सुरु केला. त्याचाच एक भाग म्हणून 29 सप्टेंबरला रात्री 9ः30 वाजता गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरल्याचे फिर्यादीच्या मित्रांनी राहुलला सांगितले. 

मित्रानी सांगितल्यानुसार, स्मशामनभूमीत काय पुरले हे पाहण्यासाठी राहुल स्माशनभूमीत गेला होता. तेथे त्याला आपला फोटो व त्याच्या प्रियेसीचा फोटो लिंबू व चंदेरी रंगाचा कागदासोबत पुरून त्यावर एक अंडे आणि दारू ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पुन्हा 28 ऑक्टोबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोवाडे मार्गावर रेश्मा बुगडे यांनी मरगुबाई मंदिराच्या बाजूच्या जंगलात जिवंत कोंबडी अंडे व एक काळे बाहुले झाडावर लटकवलेले आढळले.

या दोन्ही घटनानंतर राहुल पवार याने आजरा पोलिसात जाऊन याबाबतची तक्रार दिली. यानुसार भोंदूबाबासह चौघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Back to top button