Career

भारत फोर्ज लि. पुणे येथे 50 रिक्त जागांची भरती; संधी चुकवू नका | Bharat Forge LTD. Recruitment 2024

पुणे | भारत फोर्ज ही पुण्यातील मुंढवा परिसरातील एक प्रमुख कंपनी असून, भारतातील अग्रगण्य फोर्जिंग कंपन्यात समावेश होतो. ही कंपनी १९६१ सुमारास नीळकंठराव कल्याणी यांनी स्थापन केली. ही कंपनी वाहने, उर्जा, खनिज तेल व वायू, बांधकाम, खाणकाम, रेल्वे इंजिने आणि विमान उद्योगांशी निगडीत आहे.

कंपनीमध्ये विविध रिक्त जागांसाठी सातत्याने भरती प्रक्रिया सुरू असते. तर अनेकदा शासनाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून येथे विविध पदे भरली जातात. जर तुम्हालाही भारत फोर्ज मध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही आवश्यक ती पात्रता धारण केली असेल तर खाली दिलेल्या लिंक आणि इमेल आयडीवरून थेट अर्ज करू शकता.

भारत फोर्ज मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही Bharat Forge Career 2023 या लिंकवरून थेट अर्ज करू शकता. किंवा hrd@bharatforge.com या मेल आयडीवर तुमचे अर्ज पाठवू शकता.


पुणे | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पुणे येथील भारत फोर्ज लिमिटेड कंपनीत 50 रिक्त जागांची भरती (Bharat Forge LTD. Recruitment 2024) केली जाणार आहे.

कंपनीने ट्रेनी पदासाठी ही भरती करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी Diploma in Engineering(Dip-MECHANICAL ENGG) उमेदवार पात्र आहेत. तसेच उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान असावे. सदरची भरती फुलटाईम टेम्पररी बेसिसवर केली जाईल.

Bharat Forge LTD. Recruitment 2024

वरील रिक्त पदाच्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी पुणे येथील शहीद तुकाराम ओंबाळे मैदान,गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे – 411005 येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी उपस्थित राहावे.

मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणावी, तसेच मुलाखतीला येण्यापूर्वी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून मेळाव्यास उपस्थित राहावे.

जाहिरात – BHARAT FORGE LTD. RECRUITMENT 2024
नोंदणी – Register For Job 2024

Back to top button