शेवटची संधी: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अंतर्गतभरती; लगेच अर्ज करा.. पगार रू. 28,000/- दरमहा | Anti Corruption Bureau Bharti 2024
मुंबई | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विधि अधिकारी गट-ब पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Anti Corruption Bureau Bharti 2024) येणार आहेत. एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर,
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- मागासवर्षे – 43 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- ऑफलाईन – मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर.
- ई-मेल – acbwebmail@mahapolice.gov.in
पात्रता –
१) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
२) विधि अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
५) जी व्यक्ती शासकीय सेवेते असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तिस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असले अशा व्यक्तीची शासकीय सेवा केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र ठरेल.
PDF जाहिरात – Anti Corruption Bureau Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://acbmaharashtra.gov.in/