Career

आदिवासी विकास विभाग भरती अंतर्गत प्राथमिक शिक्षण सेवक शैक्षणिक अर्हतेबाबत महत्वाची सूचना जाहीर | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

आदिवासी विकास विभाग भरती अंतर्गत प्राथमिक शिक्षण सेवक शैक्षणिक अर्हतेबाबत महत्वाची सूचना जाहीर

मुंबई | आदिवासी विकास महामंडळ येथे सरळसेवा भरती अंतर्गत विविध रिक्त जागांची मोठी भरती (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 602 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

या भरती अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज शुल्क –

  • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
  • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-

शैक्षणिक पात्रता
1. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवीसंस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.

2. संशोधन सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

3. उपलेखापाल-मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

4. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील.

5. लघुटंकलेखक – ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र.

6. गृहपाल (पुरुष, स्त्री) – मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.

7. अधिक्षक (पुरुष, स्त्री) – मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार.

8. ग्रंथपाल – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील.

9. प्रयोगशाळा सहाय्यक – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
10. उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) – मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.

11. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार.

12. प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) – उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

13. माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) – उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
14. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक – शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.

PDF जाहिरातAdivasi Vikas Mahamandal Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Maha Tribal Development Department Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटtribal.maharashtra.gov.in

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक38600-122800
संशोधन सहाय्यक38600-122800
उपलेखापाल-मुख्य लिपिक35400-112400
आदिवासी विकास निरिक्षक35400-112400
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक25500-81100
लघुटंकलेखक25500-81100
गृहपाल (पुरुष)38600-122800
गृहपाल (स्त्री)38600-122800
अधिक्षक (पुरुष)25500-81100
अधिक्षक (स्त्री)25500-81100
ग्रंथपाल25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक19900-63200
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)35400-112400
सहाय्यक ग्रंथपाल21700-69100
उच्च माध्यमिक शिक्षण सेवकमानधन – 20,000
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)मानधन – 16,000
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)मानधन – 16,000
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)मानधन – 18,000
उच्च श्रेणी लघुलेखक41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक38600-122800

परिक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.

ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील, व त्यांचा निर्णय अंतिम असेल. दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणास पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात बाद, तक्रारी, उद्‌भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.

अर्ज करण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023  आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Back to top button